बेवफा सोनममुळे शिलाँगला बदमान केलं; पण यासाठी आहे प्रसिद्ध

सूरज यादव

राजा रघुवंशी हत्याकांड

पत्नी सोनमने राजा रघुवंशीची हत्या केल्यानं शिलाँग सध्या चर्चेत आहे. दाम्पत्य बेपत्ता झाल्यानंतर शिलाँगमधील पर्यटन आणि तिथल्या लोकांबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात होत्या.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

पूर्वेकडील स्कॉटलँड

शिलाँगला ढगांचं घर आणि पूर्वेकडील स्कॉटलँड म्हणूनही ओळखलं जातं. निसर्गसौंदर्याने नटललेल्या शिलाँगला मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देतात.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

उमियम तलाव

शिलाँगमधील उमियम तलाव हा एक मानवनिर्मित तलाव आहे. शहरापासून १५ किमी अंतरावर हा तलाव असून याचं सौदर्य पाहण्यासारखं आहे.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

एलिफंट धबधबा

शिलाँग शहरापासून १२ किमी अंतरावर हा धबधबा आहे. इंग्रजांना हा धबधबा हत्तीसारखा दिसल्यानं त्याचं नाव एलिफंट फॉल असं ठेवलं होतं.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

शिलाँग पीक

शिलाँग पीक हे शिलाँगमधील सर्वात उंच ठिकाण आहे. याची उंची १९०० मीटर इतकी आहे. या ठिकाणाहून संपूर्ण शहर दिसतं.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

बटरफ्लाय म्युझियम

भारतातलं एकमेव बटरफ्लाय म्युझियम शिलाँगमध्ये आहे. या ठिकाणी फुलपाखरू आणि पतंगांसाठी हे खास असं म्युझियम आहे.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

गरम पाण्याचा झरा

जर्काम हा सल्फरचा गरम पाण्याचा झरा आहे. हा झरा हॉट स्प्रिंग्स म्हणून प्रसिद्ध आहे.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

मौसिनराम

मौसिनराम हे भारतातल्या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. इथं निसर्गाचा आणि पावसाचा मनसोक्त आनंद लुटता येईल.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

पोलीस बाजार

शिलाँगचा मुख्य बाजार हा पोलीस बाजार आहे. हा बाजार लाकडी वस्तूंसाठी ओळखला जातो.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

नोहशंगथियांग फॉल्स

नोहशंगथियांग धबधबा चेरापूंजीपासून ४ किमी अंतरावर आहे. १ हजार पेक्षा जास्त फुटांवरून हा धबधबा कोसळतो.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

स्वीट फॉल

स्वीट फॉल धबधब्याचं पाणी ९६ मीटर उंचीवरून काळ्या कातळावर पडतं. पावसाळ्यात या धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह आणखी वेगात असतो.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

डेविड स्कॉट ट्रेल

डेविड स्कॉट ट्रेल हा एक ट्रेकिंगचा मार्ग आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गर्दी असते.

Why Shillong Remains a Tourist Favorite | Esakal

पावसाळ्यात मेघालयातली 'ही' ठिकाणं नक्की ट्राय करा

Meghalaya Monsoon Travel Guide | esakal
इथं क्लिक करा