Aarti Badade
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची एकूण संपत्ती प्रचंड आहे, पण दोघांमध्ये नेमका कोणाचा बँक बॅलन्स जास्त आहे, याबद्दल नेहमीच चर्चा असते.
Sakal
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा आणि राज यांची एकत्रित संपत्ती अंदाजे ३००० कोटी रुपये आहे. यात आलिशान मालमत्ता, प्रायव्हेट जेट आणि महागड्या कार्सचा समावेश आहे.
Sakal
पण, अलीकडेच हे दाम्पत्य मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आले, जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्यावर मोठी कारवाई केली.
Sakal
एप्रिल २०२४ मध्ये, ED ने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्राची सुमारे ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
Sakal
जप्त केलेल्या मालमत्तेत शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील फ्लॅट आणि पुण्यातील बंगला यांचाही समावेश आहे, ज्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
Sakal
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे PNB मध्ये एक संयुक्त (Joint) खाते आहे. राज कुंद्राचे एक वेगळे खातेही आहे, परंतु त्यात २०१६ पासून कोणताही व्यवहार झालेला नाही.
Sakal
मीडिया रिपोर्ट्सनुसार राज कुंद्राची वैयक्तिक संपत्ती अंदाजे २८०० कोटी रुपये आहे. ही संपत्ती त्याने प्रामुख्याने स्टील, रिअल इस्टेट आणि आयपीएल टीम (राजस्थान रॉयल्स) मधील गुंतवणुकीतून कमावली आहे.
Sakal
दुसरीकडे, शिल्पा शेट्टीची वैयक्तिक संपत्ती अंदाजे १५० कोटी रुपये आहे. तिची ही कमाई यशस्वी अभिनय कारकीर्द, फिटनेस ब्रँड्स आणि इतर व्यवसायांमधून (बिझनेस सेटअप) झालेली आहे.
Sakal
Shweta Tiwari
Sakal