सकाळ डिजिटल टीम
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर एक वेळा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालायच्या.
विवाहानंतर शिल्पाने आपल्या करिअरपासून ब्रेक घेतला आणि मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले.
शिल्पा नुकतीच 'बिग बॉस १८' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली.
मुंबईतील एका कार्यक्रमात शिल्पाला ‘खतरों के खिलाड़ी’ शोमध्ये दिसणार का, असं विचारल्यावर तिने नकार दिला, “तुम्हाला वाटतं, मी तो शो करेन? ऑफर आली तरी मी तो करू शकत नाही.”
शिल्पाने सांगितले, "आता पुन्हा कामाला लागायची वेळ आली आहे. मी हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पूर्णतः तयार आहे."
शिल्पाने हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
शिल्पाने तिची बहीण नम्रता शिरोडकरसोबत सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला, ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले.
शिल्पा आता पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याच्या तयारीत असून, तिच्या आगामी प्रकल्पांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.