सकाळ डिजिटल टीम
१४ जानेवारीच्या भागात पत्रकार परिषद पार पडली, ज्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल यांना पत्रकारांनी तीव्र प्रश्न विचारले.
पत्रकार परिषदेनंतर मिड वीक एविक्शनची घोषणा झाली. यामध्ये शिल्पा शिरोडकर घराबाहेर पडली आहे.
शिल्पा शिरोडकर, हिला नम्रता शिरोडकरने आवाहन करून मत देण्याची विनंती केली होती, ती महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचू शकली नाही.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी बिग बॉस घरात शिल्पा शिरोडकरच्या बेघर होण्याची घोषणा केली.
अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चुम दरांग, करणवीर मेहरा, रजत दलाल यामधून अंतिम विजेता निवडला जाणार आहे.
शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिला 'सेन्सेशनल क्वीन' म्हणून ओळखलं जातं. १९८९ मध्ये 'भ्रष्टाचार' चित्रपटाने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
शिल्पाने २००० मध्ये लग्न केल्यानंतर बॉलीवूडला रामराम केला आणि लंडनमध्ये वैवाहिक आयुष्य सुरु केलं.
शिल्पाने एका मुलाखतीत सांगितलं की, ती १०वी नापास आहे आणि त्यामुळे परदेशात नोकरी करायला ती सक्षम होऊ शकली नाही.