सकाळ डिजिटल टीम
भारतीय स्त्रियांसाठी दागिने हे केवळ अलंकार नसून संस्कृती आणि सौंदर्याचा अनमोल भाग आहेत. आता नवे ट्रेंड कोणते आहेत, जाणून घ्या!
ऑक्सिडाइज ज्वेलरी तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ठुशी, नथ, चोकर, बांगडी यांसारख्या प्रकारांत ती उपलब्ध आहे.
हलकी आणि आकर्षक डिझाइन असलेल्या कानातले, अंगठ्या आणि पेंडंटसारखी मिनिमलिस्ट ज्वेलरी महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे.
पोल्की दागिने सध्या वधूंसाठी हिट आहेत. आर्टिफिशियल पोल्कीही स्वस्तात उपलब्ध आहे.
तीन ते सहा पदरांमध्ये उपलब्ध असलेली जोंधळी पोत पुन्हा फॅशनमध्ये आली असून सण-समारंभासाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
सुंदर नक्षीकाम असलेली मोहनमाळ पारंपरिक वेशभूषेसोबत शोभून दिसते. हलकी आणि आकर्षक डिझाइनमुळे ती विशेष पसंतीस उतरत आहे.
देवी-देवतांचे नक्षीकाम असलेली ही ज्वेलरी पारंपरिक आणि राजेशाही लुकसाठी सर्वोत्तम आहे.
सोन्याच्या वाढत्या किमती पाहता इमिटेशन ज्वेलरीचा ट्रेंडही वाढत आहे. कमी किमतीत आकर्षक लुक मिळतो.