प्रेम, विरह अन् इतिहास! 'या' किल्ल्यात दडलाय अधुऱ्या प्रेमकथेचा रहस्यमय प्रसंग

Shubham Banubakode

शिरपूर किल्ला

वणी (यवतमाळ) पासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेला शिरपूर किल्ला आज भग्न अवस्थेत आहे. हा भुईकोट किल्ला दगडांनी बांधलेला होता.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

गोंड राज्याचा भाग

हा किल्ला चांदागडच्या गोंड राज्याच्या अधिपत्याखाली येत असे. परिसरातील परगण्यांचे प्रशासन याच भागातून चालत असे.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

आजची अवस्था

किल्ल्याच्या आत फक्त दगडी भिंती आणि काही अवशेष शिल्लक आहेत. पायविहीर आणि काही दगडी रचना आजही इतिहासाची साक्ष देतात.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

कन्नाके गोत्राचा किल्लेदार

येथील किल्लेदार कन्नाके गोत्रातील होता. हा परगणा त्या काळात अत्यंत श्रीमंत मानला जात असे आणि स्थानिक प्रशासन मजबूत होते.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

तीन भावंडाकडे जबाबदारी

अगबा, बागबा आणि राघबा हे तीन भाऊ मिळून हा परगणा सांभाळत होते. यापैकी बागबा हा कर्तबगार होता

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

प्रेमकथेची सुरुवात

बागबा आणि राजा रामशहाची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचे गुप्त भेटीगाठी सुरू झाल्या.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

युद्धाची भीषण सुरुवात

राजाला ही गोष्ट कळताच तो संतापला. त्याने बागबाविरुद्ध युद्ध पुकारले. वर्धा नदीकाठी घुग्घुस येथे १७३५ साली भीषण लढाई झाली.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

बागबाचा पराभव

या युद्धात अनेक जीव गेले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. बागबाचे भाऊ राघबा आणि अगबा यांचा मृत्यू झाला आणि परिस्थिती पूर्णपणे उलटली.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

बागबाने जीवन संपवलं

शिरपूरमध्ये आश्रय घेतलेल्या बागबाच्या कुटुंबांवरही हल्ला झाला. त्यावेळी बागबाने टोकाचं पाऊल उचललं.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

प्रेमकहाणीचा शेवट

बागबाने आपल्या कुटुंबाचा शिरच्छेच केला आणि स्वत:ही जीवन संपवलं. अशाप्रकारे बागबाची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

दाट जंगलात लपलेली रहस्यमय गुहा; महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणाबद्दल माहिती आहे का?

cave

|

esakal

हेही वाचा-