Shubham Banubakode
शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज आज इतिहासात अजरामर झाले आहेत.
शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती आज देशभरात जल्लोषात साजरी केली जाते आहे.
शिवरायांचा जन्म किल्ले शिवनेरीवर झाला असला तरी त्यांचे आजोळ सिंदखेडराजा इथे होते.
यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचं विदर्भाशी एक वेगळं नातं होतं.
शिवाजी महाराज बऱ्याचदा प्रत्यक्ष विदर्भातही येऊन गेले.
इतकंच नाही, तर शिवरायांच्या लग्नाची पत्रिका अमरावतीच्या अंबादेवी मंदिराला पाठवण्यात आली होती.
अमरावतीचे अंबादेवी मंदिर त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध होते.
सिंदखेडचे जाधव हे त्याकाळी दौलताबादच्या राजाचे सरदार होते.
त्यांना अंबादेवी मंदिराची माहिती होती. हिच माहिती माँ जिजाऊ साहेबांनाही होती.
त्यामुळे त्यांनी शिवरायांच्या लग्नाची पत्रिका अमरावतीच्या अंबादेवी मंदिराला पाठवली होती.
इ.वि. सन १७०० च्या आसपास प्रकाशित 'अमरावती शहराचा इतिहास' या पुस्तकातही याचा उल्लेख आहे.
अमरावतीचे वरिष्ठ पत्रकार भालचंद्र रेवणे यांच्या 'इये इंद्रपुरीचिये नगरी' या दिवाळी अंकात प्रकाशित लेख