Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती.
शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा आजही अंगावर शहारे आणतात.
शिवाजी महाराजांचे बांध, वेश, आणि रूप याविषयी अनेक लेखकांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
साडेतीनशे वर्षांपूर्वी फोटोग्राफी अस्तित्वात नसल्यामुळे शिवाजी महाराज कसे दिसायचे, हे अचूक सांगता येत नाही. मात्र, चित्रकारांनी त्यांची अनेक चित्रे रेखाटलेली आहेत.
१९व्या शतकातील एम. व्ही. धुरंधर यांच्या सारख्या चित्रकारांनी शिवाजी महाराजांचे रेखाटन करून त्यांचे रूप जगासमोर मांडले.
फ्रेंच प्रवासी जॉन द तेवनो १६६६ मध्ये सुरतमध्ये आला होता, त्याने शिवाजी महाराजांविषयी लिहले होते.
"राजे उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे, तेजस्वी नेत्र असलेले, आणि अत्यंत बुद्धिमान आहेत. ते फक्त दिवसातून एकदाच भोजन घेतात, आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे."
त्या काळात इतर राजांसारखे शिवाजी महाराजांच्या दरबारात नियमित चित्रकार नव्हते.
सुरत, गोलकुंडा अशा ठिकाणी राजांनी भेटी दिल्या असताना तेथील कलाकारांनी त्यांच्या चित्रांचे रेखाटन केले होते.
शिवाजी महाराजांच्या अनेक चित्रांपैकी काही संदर्भहीन आहेत, जसे मनुची नावाच्या चित्रकाराने काढलेले इब्राहीम खानचे चित्र शिवाजी महाराजांचे म्हणून ओळखले जात होते.
शिवाजी महाराजांचे खरे आणि विश्वासार्ह चित्र शोधण्याचे श्रेय इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांना जाते.
बेंद्रे यांनी डच दस्तावेजांचा अभ्यास करताना शिवाजी महाराजांचे एक रेखाचित्र शोधून काढले, जे महाराजांचे खरे चित्र मानले जाते.