महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत दिले मोलाचे योगदान

Monika Lonkar –Kumbhar

शिवजयंती

महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ही जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज हा जयंती सोहळा तारखेप्रमाणे साजरा केला जात आहे. 

Shiv Jayanti 2024

महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहणारे शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर गर्दी करतात.

Shiv Jayanti 2024

महाराष्ट्रातील किल्ले

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या किल्ल्यांच्या साथीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्यात आणलेला प्रत्येक किल्ला आज ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतो. आज आपण शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अशाच काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले.

Shiv Jayanti 2024

शिवनेरी किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाल्यामुळे या किल्ल्याला स्वराज्यामध्ये एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले होते, असे म्हटले जाते.

Shiv Jayanti 2024

तोरणा किल्ला

शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला होय. हा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते.

Shiv Jayanti 2024

असे म्हटले जाते की, या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना शिवाजी महाराजांना प्रचंड धन सापडले होते. या धनाचा उपयोग महाराजंनी स्वराज्याच्या बांधणीसाठी केला होता. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित आहे.

Shiv Jayanti 2024

पन्हाळा किल्ला

शिवाजी महाराजांच्या अनेक महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक असलेला हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. इ.स.१६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या अजस्त्र वेढ्यातून शिवाजी महाराज मोजक्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडले आणि विशाळगडावर सुखरूप पोहचले होते.

Shiv Jayanti 2024

सिंहगड किल्ला

स्वराज्याचा झुंझार मावळा वीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत इ.स.१६७० मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला होता. हा किल्ला तर त्यांनी जिंकला परंतु, शत्रूसोबत दोन हात करताना त्यांनी प्राण गमावले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल, ‘गड आला, पण सिंह गेला’ असे उद्गार काढले होते.

Shiv Jayanti 2024

दीपिकाची बाफ्तामध्ये हवा..!

Deepika Padukone latest news