सकाळ डिजिटल टीम
एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांनी गतवर्षी देशातील सर्वाधिक दान करणारे उद्योजक म्हणून पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले आहे.
India Philanthropy Top Donors
esakal
एडेलगिव हुरुन इंडिया फिलांथ्रॉपी यादी 2025 नुसार, शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 2,708 कोटी रुपये दान केले. याची विभागणी केली असता, रोजच्या रोज अंदाजे 7.4 कोटी रुपये दान केले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
India Philanthropy Top Donors
esakal
गेल्या पाच वर्षांत शिव नादर चौथ्यांदा या यादीत सर्वाधिक दान करणारे ठरले आहेत. त्यांच्याकडून करण्यात येणारे हे दान शिव नादर फाऊंडेशन मार्फत केले जाते. या फाऊंडेशनतर्फे शिव नादर विद्यापीठ, तसेच वंचित विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विद्याज्ञान शाळांचा समावेश आहे.
India Philanthropy Top Donors
esakal
हुरुन रिसर्च आणि एडेलगिव फाऊंडेशन यांनी भारतातील उद्योजक, उद्योगपती आणि कुटुंबांनी केलेल्या दानाची यादी जाहीर केली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत रोख किंवा तत्सम आर्थिक दानाचा यात समावेश करण्यात आला आहे.
India Philanthropy Top Donors
esakal
1) शिव नादर व कुटुंब – 2,708 कोटी (प्रतिदिन 7.4 कोटी)
2) मुकेश अंबानी व कुटुंब – 626 कोटी (प्रतिदिन 1.7 कोटी)
3) अझीम प्रेमजी – 526 कोटी (प्रतिदिन 1.4 कोटी)
4) कुमार मंगलम बिर्ला व कुटुंब – 440 कोटी
5) गौतम अदानी व कुटुंब – 386 कोटी
6) रोहिणी निलेकणी – 204 कोटी
India Philanthropy Top Donors
esakal
यादीतून हे स्पष्ट झाले आहे, की भारतीय उद्योजकांकडून सर्वाधिक दान शिक्षण या क्षेत्रात करण्यात आले आहे. एकूण पाहता, भारतातील अब्जाधीश आणि उद्योजक कुटुंबांनी 2024-25 या कालावधीत मिळून 10,380 कोटी रुपये विविध सामाजिक क्षेत्रांसाठी दान केले आहेत.
India Philanthropy Top Donors
esakal
Why Are Flamingos Pink?
esakal