Flamingo Bird : फ्लेमिंगो गुलाबी का असतात? कसा बदलतो त्यांचा रंग? जाणून घ्या यामागचं रहस्य!

सकाळ डिजिटल टीम

फ्लेमिंगो गुलाबी का असतात?

फ्लेमिंगो आपल्या सुंदर गुलाबी रंगामुळे जगभर प्रसिद्ध आहेत; पण तुम्हाला माहीत आहे का? जन्माच्या वेळी फ्लेमिंगो गुलाबी नसतात, तर त्यांचा रंग तपकिरी असतो? मग, प्रश्न असा निर्माण होतो की हा सुंदर गुलाबी रंग त्यांना नेमका कुठून मिळतो? चला जाणून घेऊया…

Why Are Flamingos Pink?

|

esakal

फ्लेमिंगोच्या रंगामागचं गुपित

‘फ्लेमिंगो’ हे नाव एका स्पॅनिश शब्दातून आले आहे, ज्याचा अर्थ 'अग्नीचा रंग' असा होतो. मात्र, हा रंग त्यांच्या जनुकांमधून नाही, तर त्यांच्या आहारातून मिळतो.

Why Are Flamingos Pink?

|

esakal

अन्नामध्ये विशेष रंगद्रव्य

फ्लेमिंगोच्या अन्नामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे एक विशेष रंगद्रव्य असते. हे रंगद्रव्य नैसर्गिकरित्या लाल-नारिंगी रंगाचे असते आणि हाच रंग नंतर त्यांच्या पिसांमध्ये झळकतो.

Why Are Flamingos Pink?

|

esakal

फ्लेमिंगो काय खातात?

फ्लेमिंगो प्रामुख्याने शेवाळ, ब्राइन कोळंबी आणि ब्राइन फ्लाय लार्वा खातात. या सर्व पदार्थांमध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते.

Why Are Flamingos Pink?

|

esakal

पंखांमध्ये कोणता बदल होतो?

पचन प्रक्रियेदरम्यान हे रंगद्रव्य लहान घटकांमध्ये विभागले जाते आणि शरीरात शोषल्यानंतर पंखांमध्ये व त्वचेत साठवले जाते. त्यामुळे त्यांचा रंग हळूहळू गुलाबी, नारिंगी किंवा लालसर होतो.

Why Are Flamingos Pink?

|

esakal

फ्लेमिंगो एकसारख्या रंगाचे नसतात

सर्व फ्लेमिंगो एकसारख्या रंगाचे नसतात. काही हलक्या गुलाबी रंगाचे असतात, काही गडद गुलाबी, काही नारिंगी किंवा लालसर तर काही अगदी पांढरेही असतात. हा फरक त्यांच्या निवासस्थानावर आणि आहारावर अवलंबून असतो.

Why Are Flamingos Pink?

|

esakal

फ्लेमिंगोच्या जगभरात सहा प्रमुख प्रजाती

जगभरात फ्लेमिंगोच्या सहा प्रमुख प्रजाती आढळतात आणि प्रत्येक प्रजातीचा रंग थोडा वेगळा असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही गुलाबी फ्लेमिंगो पाहता, तेव्हा लक्षात ठेवा त्यांचा रंग हा निसर्गाने दिलेल्या आहारातून आलेला आहे, डीएनएतून नाही!

Why Are Flamingos Pink?

|

esakal

Best Honeymoon Destinations : जोडप्यांसाठी स्वर्ग! भारतातील 'ही' ठिकाणं हनिमूनला करतील अविस्मरणीय

Best Honeymoon Destinations in India

|

esakal

येथे क्लिक करा...