Mayur Ratnaparkhe
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा शिवनेरी किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला
राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. कान्होजी आंग्रेंनी अरबी समुद्रातल्या ज्या किल्ल्यामुळे पाय रोवले तो किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग.
साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे.
जिंजीचा किल्ला हा तामिळनाडू राज्यात आहे. तो दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रतापगड हा किल्ला शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारा किल्ला आहे, या किल्ल्याच्या पायथ्याशीच शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.
पन्हाळा किल्ला हा पन्हाळगड म्हणूनही ओळखला जातो. शिवा काशीद व बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला आहे.
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे
खांदेरी हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे
सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सागरी वारशाचे भव्य प्रतीक म्हणून अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यात दिमाखात उभा आहे.
लोहगड किल्ला इतिहास आणि सौंदर्य यांचे अद्वितीय मिश्रण आहे. लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर हा किल्ला आहे.