Shubham Banubakode
नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील भांबोरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा ऐतिहासिक वाडा आहे.
सध्या या वाड्याची काही प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र, त्याचे अवशेष आजही आहे. ते इतिहासाची साक्ष देतात.
विठोजीराजे यांचे वंशज प्रवीणजी भोसले यांच्याकडे 'भांबोरकर भोसले दफ्तर' हे दुर्मिळ पुस्तक आणि एक तलवार आहे.
मालोजीराजे आणि विठोजीराजे हे बंधू वणगंपाळ निंबाळकरांकडे चाकरी करीत होते. कोल्हापूर प्रांतातील स्वारीत त्यांनी पराक्रम गाजवला होता.
मालोजी आणि विठोजी यांनी निजामशाहीत मलिक अंबरला पाठिंबा दिला. त्यांना १५०० मनसबदारी आणि जुन्नर परगणा मिळाला होता.
इ.स. १६०६-०७ मध्ये इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी तिथेच आहे.
विठोजीराजे यांचा सहावा पुत्र परसोजीराजे यांचे वंशज भांबोरे आणि नांदनज येथे राहतात. परसोजी यांनी वऱ्हाड, खानदेशात बंडखोरांचा बंदोबस्त केला होता.
परसोजी यांचे पुत्र सयाजी आणि त्यांचे वंशज खेलोजीराजे यांनी छत्रपती शाहूमहाराजांच्या सेवेत स्वराज्यात योगदान दिले.
खेलोजीराजे यांचे वंशज अप्पाजीराजे हे रागीट, बलवान आणि धाडसी होते. गाईंची झुंज सोडवण्याच्या प्रसंगामुळे त्यांच्याबद्दल आख्यायिका प्रचलित आहे.
भांबोरकर भोसले घराण्याचा आजही जपला जातो आहे. पुरातन तलवार आणि दफ्तर भांबोरे येथील वाड्यात जतन करण्यात आले आहेत.