Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कसा होता याबाबत कायमच कुतूहल असतं आणि अगदी जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांबाबतही जाणून घ्यावंसं वाटतं.
shivaji maharaj
esakal
शिवकाळात मिरची होती का, मसाले म्हणून नेमकं काय वापरलं जायचं आणि तिखटपणा कुठून येत असे, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.
shivaji maharaj
esakal
त्या काळात आजसारखी मिरची सर्वत्र उपलब्ध नसल्याने तिखट चवीसाठी वेगळ्या घटकांचा आधार घेतला जात होता.
shivaji maharaj
esakal
काळी मिरी हा शिवकाळातील प्रमुख तिखट मसाला म्हणून वापरला जात असे.
shivaji maharaj
esakal
काळी मिरीसोबतच आलं आणि लसूण यांनाही नैसर्गिक तिखटपणा असल्यामुळे स्वयंपाकात त्यांचा वापर होत असे.
shivaji maharaj
esakal
यामध्ये आलं हे मसाला आणि औषध अशा दोन्ही स्वरूपात विशेष महत्त्वाचं मानलं जात होतं.
पाच हजार वर्षांहून अधिक काळापूर्वी भारतीय आणि चिनी संस्कृतींमध्ये आलं अन्नासोबतच औषधी टॉनिक म्हणून वापरलं जात होतं.
shivaji maharaj
esakal
आलं हे शिवाजी महाराजांच्या काळात भारतातच पिकणारं उत्पादन असल्याच्या नोंदी आढळतात
shivaji maharaj
esakal
शिवकाळाच्या खूप आधीपासून भारतात आलं रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं होतं.
shivaji maharaj
esakal
महाराष्ट्रात थेट ऐतिहासिक नोंदी कमी असल्या तरी सातवाहन काळापासून महाराष्ट्रात आल्याचा वापर होत असणं स्वाभाविक मानलं जातं.
मसालेदार पदार्थ, काढे आणि पारंपरिक घरगुती उपचारांमध्ये आलं मोठ्या प्रमाणात वापरलं जात होतं.
shivaji maharaj
esakal
इतिहासाची औपचारिक नोंद होण्याआधीच आलं चव वाढवणारा घटक म्हणून वापरात येऊन मसाल्यांच्या व्यापाराचा भाग बनलं.
shivaji maharaj
esakal
दोन हजार वर्षांपूर्वी भारतातून आलं रोमन साम्राज्यात निर्यात केलं जात होतं, याचे उल्लेख आढळतात.
shivaji maharaj
esakal
मध्ययुगीन काळात युरोपमध्ये एका पौंड आल्याची किंमत थेट एका मेंढीइतकी असल्याचा उल्लेख आहे.
shivaji maharaj
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मसाला म्हटलं की काळी मिरीसोबत आलं हे चव आणि आरोग्य दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाचं घटक होतं, हे इतिहासातून स्पष्ट होतं.
shivaji maharaj
esakal
shivaji maharaj
esakal