छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर ‘तुपाच्या विहिरी’ खरंच होत्या का?

Sandip Kapde

प्रश्न

शिवरायांच्या किल्ल्यांवर तुपाच्या विहिरी होत्या का, हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

अभिमान

छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे किल्ले, सरदार आणि मावळे हे सर्वच आपल्या इतिहासातील गौरवशाली विषय आहेत.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

वारसा

शिवरायांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी जिव्हाळ्याची आणि कुतूहल निर्माण करणारी आहे.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

संख्या

आज उपलब्ध माहितीनुसार शिवरायांशी संबंधित सुमारे अडीचशे किल्ले ओळखले जातात.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

वास्तव

या किल्ल्यांपैकी बहुसंख्य, म्हणजे दोनशे सत्तेचाळीस किल्ल्यांवर तुपाच्या विहिरींचा कोणताही पुरावा आढळत नाही.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

अफवा

इतकेच नव्हे, तर अशा विहिरींबाबत ठोस दंतकथा किंवा ऐतिहासिक उल्लेखही बहुतांश ठिकाणी नाहीत.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

स्थळ

पन्हाळगडाजवळील पावनगडावर महादेव मंदिराच्या मागे एक छोटीशी गुंपी आढळते.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

फलक

या गुंपीजवळ वन खात्याने तुपाची विहीर असा फलक लावलेला दिसतो.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

संज्ञा

प्रत्यक्षात खडकात खोदलेल्या अशा चौकोनी रचनेला टाके किंवा हौद असे संबोधले जाते.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

उपयोग

अशा टाक्यांचा मुख्य उद्देश पाणी साठवणे हाच असतो.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

तर्क

तूपसारखा मौल्यवान पदार्थ उघड्यावर जमिनीत साठवणे व्यवहार्य वाटत नाही.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

पर्याय

किल्ल्यांवरील कोठारांमध्ये मडकी, माठ, रांजण किंवा काचेच्या बरण्यांत तूप सहज साठवता येऊ शकते.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

सुरक्षा

उघड्या टाक्यात तूप ठेवायचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र पहारा ठेवावा लागला असता.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

संदर्भ

तेल आणि तुपाच्या साठवणीबाबत शिवकाळातील स्पष्ट उल्लेख आज्ञापत्रात आढळतो.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

आदेश

आमात्य रामचंद्र पंत यांनी खडकाच्या प्रकारानुसार टाकी बांधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

रचना

या आज्ञेत गच्चीघर उभारून मोठ्या काचेच्या मर्तबानांमध्ये साठवण करण्याचे वर्णन आहे.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

पुरावा

तेल-तुपाच्या साठवणीसंबंधी उपलब्ध असलेला हा एकमेव अस्सल शिवकालीन दस्तऐवज मानला जातो.

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

पावनगड

पावनगडाच्या बांधकामाच्या उल्लेखांमध्ये कुठेही तुपाची विहीर किंवा टाके असल्याचा संदर्भ सापडत नाही. (संदर्भ-मराठेशाही प्रविण भोसले)

The Truth About Ghee Wells on Shivaji Maharaj’s Forts

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी चारवेळा रचण्यात आला होता कट... 

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा