Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळातून केली. हा छोटा पण डोंगर, जंगल आणि नद्यांनी युक्त प्रदेश लष्करी दृष्टिकोनातून अजिंक्य होता.
शिवरायांनी घाटावर किल्ले बांधण्याचे धोरण स्वीकारले. हे किल्ले तपासणी चौक्यांसारखे होते, जिथून शत्रूचा प्रवेश अशक्य होता. त्यांनी 111 किल्ले बांधले आणि 49 किल्ल्यांची डागडुजी करून अभेद्य केले.
समुद्रावरील हल्ल्यांना रोखण्यासाठी शिवरायांनी किनारपट्टीवर प्रत्येक 12 ते 19 मैलांवर सागरी किल्ले बांधले. रत्नागिरी जिल्ह्यातच त्यांचे 52 सागरी किल्ले होते.
पुणे परिसरात शिवरायांनी 30 डोंगरी आणि 2 भुईकोट असे 32 किल्ले बांधले. शत्रू येण्याच्या मार्गांवर जास्त किल्ले उभारून त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणाची रचना केली.
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांसारख्या सागरी किल्ल्यांनी स्वराज्याला समुद्राकडून येणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवले.
एकदा पंत अमात्यांनी एका पत्रात किल्ल्यांच्या खर्चाबद्दल विचारले होतं, तेव्हा शिवराय म्हणाले, “किल्ले म्हणजे शेत राखणारा माळा! तारवास खिळ्यांनी बळकट करतात, तसे किल्ले स्वराज्याला बळकटी देतात.”
“औरंग्याची उमर जाईल, पण तो आम्हाला जिंकू शकणार नाही. 360 किल्ले आहेत, एक किल्ला जिंकायला एक वर्ष लागलं तरी त्याला 360 वर्षे लागतील!” त्यांचं हे वाक्य किल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित करते.