Aarti Badade
मालवणच्या समुद्रात दिमाखात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर त्याच्या बांधकामात अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत.
Sindhudurg Fort History
Sakal
अरबी समुद्रातील कुर्ते बेटावर असलेल्या या जलदुर्गाची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असून, १६६४ मध्ये बांधकामाला सुरुवात होऊन १६६७ मध्ये ते पूर्ण झाले.
Sindhudurg Fort History
Sakal
सुमारे ४८ एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी तब्बल ७० हजार किलो लोखंड वापरल्याचे सांगितले जाते.
Sindhudurg Fort History
Sakal
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अशा वाकड्या-तिकड्या रचनेत बांधले आहे की, समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या जहाजांना ते सहज दिसत नसे आणि प्रवेशद्वाराचा अंदाज लावणे कठीण जात असे.
Sindhudurg Fort History
Sakal
समुद्राच्या उंच लाटा आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामात दगडांसोबत शिशाचा आणि लोखंडाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते.
Sindhudurg Fort
Esakal
किल्ल्याच्या परिसरातील एका शिळेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे या ठिकाणाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.
Shivaji Maharaj’s handprints and footprints at Sindhudurg Fort!
Sakal
चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात दूधबाव आणि दहीबाव यांसारख्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. समुद्राच्या मध्यभागी गोड्या पाण्याचे स्रोत असणे हे या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य आहे.
Sindhudurg Fort
Esakal