छत्रपती शिवाजी महाराज 'या' किल्ल्यात लपवत होते स्वराज्याचा खजिना, कारण आहे खास

Yashwant Kshirsagar

स्वराज्याचा खजिना

महाराष्ट्रात अनेकविध प्रकारचे गडकिल्ले असून, प्रत्येक गडाचं आपलं असं एक महत्त्वं आहे. पण त्यातील एक किल्ला खूप महत्त्वाचा, की जिथं खुद्द छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा खजिना लपवला जात होता असं सांगितलं जातं.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

लोहगड

लोहगड समुद्रसपाटीपासून साधारण 3400 फूट इतक्या उंचीवर असणारा हा किल्ला 18 व्या शतकात बांधण्यात आला. मराठा शासकांशिवाय या किल्ल्यावर विदर्भ शासकांचंही अधिपत्य पाहायला मिळालं.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

महत्त्व

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला खूप महत्त्व होतं,कारण, ही याच किल्ल्यावर त्यांचा खजिना ठेवला जात होता.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

अभेद्य

मराठा साम्राज्यातील अनेक शिलेदार या किल्ल्याचं रक्षण करत असत. हा किल्ला खऱ्या अर्थानं अभेद्य होता. कारण, इथवर पोहोचणं जवळपास शत्रूला अशक्य होतं.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

भक्कमपणा

पुणे जिल्ह्यातील इंद्राणी खोऱ्यामध्ये हा किल्ला आजही उभा असून, या किल्ल्याच्या भक्कमपणामुळं आणि शत्रूच्या नजरेआड असण्यामुळं इथंच खजिना ठेवण्यास प्राधान्य दिलं जात असे असं सांगितले जाते.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

सूरतेची लूट

इतिहासकारांच्या मते मराठा साम्राज्यानं सूरतेची लूट केल्यानंतर तिथून आणलेला ऐवजही इथंच ठेवण्यात आला होता. ज्यामुळं या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त होतं.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

साहसप्रेमींसाठी आकर्षण

आजच्या घडीला इतिहासाच्या पाऊलखुणांशिवाय हा किल्ला अनेक साहसप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरतो.

Lohagad Fort Swarajya Treasure | esakal

आग्र्यावरुन सुटका केल्यानंतर ७२ तासाचं अंतर शिवरायांनी १२ तासात कसं कापलं?

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा