Sandip Kapde
शाहिस्तेखानावरच्या धाडसपूर्ण हल्ल्यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला आणखी एक मोठा झटका दिला.
shivaji maharaj
esakal
महाराजांनी ६ ते १० जानेवारी १६६४ दरम्यान सुरत शहर सलग पाच दिवस लुटून अफाट संपत्ती मिळवली.
shivaji maharaj
esakal
त्या काळी सुरत हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे आणि समृद्ध बंदर होते.
shivaji maharaj
esakal
सुरतवरून जगभरात जहाजांद्वारे विविध वस्तूंचा सतत व्यापार चालत असे.
shivaji maharaj
esakal
या शहरामुळे मोगल साम्राज्याला दरवर्षी प्रचंड आर्थिक फायदा मिळत असे.
shivaji maharaj
esakal
मक्केला जाणाऱ्या जहाजांचा मुख्य प्रस्थानबिंदू सुरत असल्याने त्याला ‘मक्केचा दरवाजा’ही म्हणत असत.
shivaji maharaj
esakal
सुरत येथील जकातीमुळे औरंगजेबाच्या खजिन्यात दरवर्षी जवळपास १२ लाख रुपये जमा होत.
shivaji maharaj
esakal
सुरत लुटीच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या होलकार्ड इव्हर्सनने या घटनेचे वर्णन डच भाषेत नोंदवले.
shivaji maharaj
esakal
इव्हर्सनच्या मते सुरत शहर हे धनवैभव आणि सौंदर्याने परिपूर्ण असे मोहक ठिकाण होते.
shivaji maharaj
esakal
सुरतला मोगल बादशहाची ‘दाढी’ असे संबोधले जाई, कारण ते साम्राज्याच्या शान आणि श्रीमंतीचे प्रतीक होते.
shivaji maharaj
esakal
सुरत लुटून निघताना शिवराय म्हणाले, “औरंगजेबाची दाढी खेचण्याची माझी फार काळापासून इच्छा होती, ती पूर्ण झाली.”
shivaji maharaj
esakal
त्या काळी दाढीला व्यक्तीच्या शान, प्रतिष्ठा आणि इज्जतीचे प्रतीक मानले जात असे.
shivaji maharaj
esakal
औरंगजेबाने तर दाढी किती लांब असावी याबाबत खास नियम घालून दिले होते.
shivaji maharaj
esakal
सुरत शहराला औरंगजेबाच्या इज्जत, रुबाब आणि आर्थिक शक्तीचे प्रतीक म्हणून दाढीची उपमा दिली जात होती.
shivaji maharaj
esakal
म्हणूनच शिवरायांनी ‘दाढी ओढली’ म्हणजे औरंगजेबाच्या इज्जतीचा धक्का उडवला असा त्याचा अर्थ होता. (मराठेशाही प्रविण भोसले या चॅनलवर ही माहिती दिली आहे)
shivaji maharaj
esakal