Shubham Banubakode
4 फेब्रुवारी ते 10 मार्च 1677 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हैद्राबाद (भागानगर) येथे एक महिना मुक्काम केला.
महाराजांच्या स्वागतासाठी भागानगर शृंगारले गेले. मिरवणुकीत सैनिकांनी भरजरी पोषाख परिधान केले होते. लोकांनी फुले उधळली, सुवासिनींनी ओवाळले, आणि महाराजांनी चांदी-सोन्याचे द्रव्य उधळत जयघोषात शहरात प्रवेश केला.
महाराजांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख राजरस्त्याने गोशा महाल येथे पोहोचली. गोशा महाल, सध्याच्या विनायक विद्यालंकार मार्गावर असलेल्या स्टेडियमच्या जागी, सैन्याच्या राहण्याची व्यवस्था होती.
गोशा महालात सैन्य ठेवून महाराज स्वतः लालमहालात राहायला गेले. लालमहाल सध्याच्या हैद्राबाद हायकोर्टच्या जागेवर होता, जिथे त्यांच्या वास्तव्याची सोय कारभाऱ्यांनी केली होती.
महाराजांनी दादमहालात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी फक्त पाच असामी बरोबर घेतले. सिंहासनावर जाण्यासाठी पायऱ्या चढताना कुतुबशहाने स्वतः पुढे येऊन महाराजांना आलिंगन दिले.
कुतुबशहा आणि महाराज सिंहासनावर बसले, तर मादण्णा जवळ बसले. दोन सार्वभौमांचे सौहार्दपूर्ण स्वागत पाहून मादण्णा आणि अकण्णा यांना आनंद झाला.
कुतुबशहाचे मुख्यमंत्री मादण्णा यांनी महाराजांना काजीसाबकी देवडी येथील आपल्या घरी शाही खाना दिला. मादण्णाच्या मातोश्रींनी स्वतः अन्न पदार्थ बनवले होते, आणि महाराज, मादण्णा व अकण्णा एकत्र जेवले.
महाराजांनी मुचकुंद नदीवरील केशवस्वामीच्या मठास भेट दिली. जियागुडा येथील पंढरीनाथाच्या देवळात केशवस्वामीच्या कीर्तनाला हजारो लोक उपस्थित होते.
एका दिवशी येसाजी कंकाने मत्त हत्तीशी सामना करून त्याची सोंड कापली. महाराजांनी मेजवान्या आणि नजराणे देऊन सर्वांना संतुष्ट केले.
महाराज आणि कुतुबशहाने मोगलांचा प्रभाव दक्षिणेत रोखण्याचे ठरवले. कर्नाटक स्वारीसाठी कुतुबशहाने दरमहा साडेचार लाख खर्च आणि 500 स्वार देण्याचे मान्य केले.
रायगडावर नाही तर पायथ्याशी असलेल्या या वाड्यात राहायच्या माँ जिजाऊ, इतिहासाची देतोय साक्ष...