औरंगजेबाला चकवा देत शिवरायांनी कोणता मार्ग निवडला? २६०० किमींचा थरारक गुप्त प्रवास

Sandip Kapde

पलायन

औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातून शिवरायांनी १७ ऑगस्ट १६६६ पूर्वी गुप्तपणे बाहेर पडत थरारक प्रवासाला सुरुवात केली.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

साथी

या धाडसी मोहिमेत शिवरायांसोबत संभाजीराजे, निराजी रावजी, दत्ताजी त्रिंबक आणि राघोजी मित्रा हे चारच विश्वासू सहकारी होते.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

वेष

आग्र्याबाहेर पडताच सर्वांनी संन्यासी आणि बैराग्याचा वेश धारण करून आपली खरी ओळख लपवली.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

मथुरा

यमुनेच्या काठाने सुमारे ५० किमी प्रवास करून ते मथुरेला पोहोचले आणि कृष्णजन्माष्टमीच्या गर्दीत सहज मिसळले.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

योजना

ओळख पटू नये म्हणून संभाजीराजांना मथुरेत विश्वासू व्यक्तींकडे सुरक्षित ठेवण्यात आले.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

संदेश

राजगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर संभाजीराजांना आणण्यासाठी माणसे पाठवू, असा निरोप देऊन शिवराय पुढे निघाले.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

प्रवास

मथुरेनंतर प्रयाग, काशी आणि गया असा प्रवास करत त्यांनी पुढील मार्गाची माहिती गोळा केली.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

दिशाभूल

मुघलांनी दख्खनचे सर्व रस्ते बंद केले असतानाही शिवरायांनी पूर्वेकडे वळून त्यांची मोठी दिशाभूल केली.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

मार्ग

गयाहून अमरकंटक, रायपूर, दुर्ग, भोपालपट्टणम, सिरोंचा, बिदर आणि पंढरपूरमार्गे त्यांनी परतीचा प्रवास सुरू ठेवला.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

नद्या

नर्मदा, सोन, इंद्रावती, गोदावरी, भीमा आणि नीरा नदीच्या परिसरातून हा अत्यंत कठीण प्रवास पार पडला.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

अंतर

सुमारे ९६ दिवसांत जवळपास २६०० किलोमीटरचा पायी आणि जलमार्गाने प्रवास करत शिवरायांनी संकटांवर मात केली.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

आगमन

२० नोव्हेंबर १६६६ रोजी शिवराय आपल्या तीन विश्वासू साथीदारांसह सुखरूप राजगडावर पोहोचले.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

पराक्रम

हा प्रवास केवळ पलायन नव्हता, तर दूरदृष्टी, धैर्य, गुप्त नियोजन आणि स्वराज्यनिष्ठेचा अद्वितीय इतिहास होता.

Shivaji Maharaj's Secret 2,600 km Escape Route from Agra to Rajgad

|

esakal

अनेकांना माहीतच नाही... इथे आहे शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेंची समाधी 

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

येथे क्लिक करा