Aarti Badade
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत गुप्तहेर यंत्रणेचे मोठे योगदान होते. या यंत्रणेचे प्रमुख म्हणून बहिर्जी नाईक यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
bahirji naik
Sakal
बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे विश्वासू गुप्तहेर मानले जातात. शत्रूंच्या प्रदेशातील महत्त्वाची माहिती गोळा करून ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
bahirji naik
शत्रूच्या प्रदेशात सहज वावरता यावे यासाठी बहिर्जी नाईक विविध वेश धारण करत असत, अशी ऐतिहासिक परंपरेत नोंद आढळते. त्यामुळे गुप्त माहिती मिळवणे त्यांना शक्य होत असे.
bahirji naik
मुघल आणि आदिलशाही यांसारख्या सत्तांच्या सैन्याच्या हालचाली, किल्ल्यांची सुरक्षा आणि शत्रूंच्या योजनांची माहिती मिळवण्याचे काम गुप्तहेर यंत्रणेमार्फत केले जात असे.
शत्रूची ताकद, सैन्याची ठिकाणे आणि प्रवासाचे मार्ग यांची माहिती मिळाल्याने महाराजांना मोहिमांचे नियोजन करणे सोपे होत असे. या कामात बहिर्जी नाईकांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
अफझलखानाची मोहीम आणि मुघलांविरोधातील लढाया अशा अनेक प्रसंगांत गुप्त माहितीला विशेष महत्त्व होते. शत्रूच्या हालचाली आधीच समजल्याने स्वराज्याच्या रणनीतीला मदत मिळत असे.
bahirji naik
esakal
बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली गावकरी, व्यापारी आणि इतर माहितीदारांच्या मदतीने गुप्तचरांचे जाळे कार्यरत असल्याचे सांगितले जाते. स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरली.
bahirji naik
Sakal
Kothaligad Fort
Sakal