Yashwant Kshirsagar
शेवग्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शेवग्याचा वापर जवळपास 300 पेक्षा जास्त आजारांत केला जातो त्यामुळे यास आयुर्वेदात खूप महत्व आहे.
शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पोषक घटक आहेत, तसेच याच्या पानांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म आहेत.
शेवग्याचा पाल्याची पावडर सौंदर्यप्रसाधनापासून ते अनेक औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते
भारतात तसेच जागतिक स्तरावर देखील शेवगा पानांच्या पावडरला चांगली मागणी आहे.
याच संधीचे सोने करत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावातील महादेव मोरे या युवा शेतकऱ्याने शेवगा पावडर सातासमुद्रापार विकून चांगली कमाई केली आहे.
महादेव मोरे यांनी तयार केलेली बहुगुणी शेवगा पावडर आता भारतासह अमेरिकेतही विकली जात आहे यातून त्यांना उत्तम अर्थार्जन होत असून शेतकऱ्यांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
महादेव मोरे यांनी दुष्काळामध्ये एक एकरावर शेवगाच्या शेतीचा प्रयोग केला होता. कोरोनामध्ये शेवग्याच्या शेतीत नुकसान झाले होते. त्यातून झालेला खर्च सुद्धा निघाला नव्हता
पण त्यातून त्यांचा झालेला खर्च सुद्धा निघाला नव्हता. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा न विकता शेवग्याच्या पानांची पावडर करून विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या प्रयोगाला चांगले यश आले.
महादेव मोरे यांनी आता तब्बल साडेसात एकरावर शेवग्याच्या झाडांची लागवड केली आहे. अमेरिकेसह देशात कोलकाता, हैदराबाद, नागपूर आणि मुंबई तसेच पुणे येथे त्यांची पावडर विकली जाते.
महादेव मोरे यांना एकरी दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यांना वर्षाकाठी लाखोंचा नफा मिळत आहे. त्यांच्या शेवगा प्रक्रिया उद्योगाला भेट देण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.