शिवरायांनी आपल्या बजेटमध्ये किल्ल्यासाठी किती रुपये मंजूर केले होते? अर्थमंत्र्यांचा होता आक्षेप

सकाळ वृत्तसेवा

शिवछत्रपतींचा दुर्गदृष्टिकोन

शिवाजी महाराजांसाठी गड म्हणजे केवळ संरक्षण नव्हे, तर स्वराज्याच्या मुळाशी असलेले बळ होते. १६७१-७२ मध्ये महाराजांनी गडांच्या दुरुस्ती आणि नव्या बांधकामासाठी १,७५,००० होन खर्च मंजूर केला होता.

Shivaji maharaj | Sakal

रायगडासाठी सर्वाधिक खर्च

राजधानी रायगडासाठी तब्बल ५०,००० होन मंजूर करण्यात आले होते. यात ३५,००० होन घरे व तळी यासाठी, तर १५,००० होन तटबांधणीसाठी होते.

Shivaji maharaj | Sakal

प्रमुख किल्ल्यांसाठी समान वाटा

सिंहगड, विजयदुर्ग, राजगड, प्रतापगड आदी १० किल्ल्यांसाठी प्रत्येकी १०,००० होन खर्च ठरविण्यात आला होता.

Shivaji maharaj | Sakal

मध्यम गडांचा खर्च

महिपतगड, सुधागड, लोहगड, श्रीवर्धनगड यांसारख्या गडांवर प्रत्येकी ५,००० होन खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Shivaji maharaj | Sakal

किरकोळ गडांचेही भान

कोटीगड, सारसगड, मनोहरगड यांसाठीही १,००० ते ३,००० होन खर्च करण्यात आला. किरकोळ दुरुस्तीसाठी ७,००० होन बाजूला ठेवले होते.

Shivaji maharaj | Sakal

मुत्सद्यांचा आक्षेप

मोरोपंत पेशवे आणि निराजीपंत मुजुमदार यांनी खर्चावर आक्षेप घेतला – "लोक व पैसा दोन्ही फार खर्ची पडत आहेत".

Shivaji maharaj | Sakal

शिवाजी महाराजांचं ठाम उत्तर

महाराजांनी परखड उत्तर दिले: "दौलत आहे, विचार करूनच खर्च करतो." गडांमुळेच स्वराज्य सुरक्षित राहते आणि शत्रूपासून संरक्षण होते असे त्यांचे मत होते.

Shivaji maharaj | Sakal

गड म्हणजे अभेद्य कवच

"३६० गड आहेत, एक एक गड वर्ष लढला तरी ३६० वर्षे शत्रूला लागतील" – असा दूरदृष्टीपूर्ण विचार महाराजांनी मांडला होता. हाच महाराजांचा दुर्गदृष्टिकोन होता!

Shivaji maharaj | Sakal

कोणी लिहिला होता शिवरायांवरचा पहिला पोवाडा? अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी दिलेलं बक्षीस

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा