कोणी लिहिला होता शिवरायांवरचा पहिला पोवाडा? अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी दिलेलं बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

अज्ञानदास – शिवकालीन शाहीर

अज्ञानदास हे १७व्या शतकातील शिवकालीन शाहीर होते. त्यांना अगिनदास ह्या नावानेही ओळखले जात असे.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

पुण्याचे रहिवासी

अज्ञानदास हे पुण्यात राहणारे होते. त्यांच्या गुरूचे नाव नारायण असल्याचा उल्लेख काही संदर्भांमध्ये आढळतो.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

अफझलखान वधाचा पोवाडा

अज्ञानदास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर त्यावर पोवाडा रचला, जो आजही इतिहासात महत्त्वाचा मानला जातो.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

महाराजांच्या उपस्थितीत पोवाडा गायन

शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर झालेल्या आनंदोत्सवात अज्ञानदास यांनी हा पोवाडा गाऊन दाखवला.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

महाराजांकडून विशेष बक्षीस

अज्ञानदास यांच्या अप्रतिम काव्यप्रतिभेने प्रभावित होऊन महाराजांनी त्यांना एक घोडा व शेरभर सोन्याचा तोडा बक्षीस दिला.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

पोवाड्याची वैशिष्ट्ये

अफझलखान वधाचा हा पोवाडा एकूण ३७ चौकांचा आहे. यात शिवरायांच्या गड, किल्ले व महाल यांची नावेही नमूद आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

उपलब्ध असलेला सर्वांत जुना पोवाडा

इतिहासातील उपलब्ध असलेल्या पोवाड्यांमध्ये हा पोवाडा सर्वांत जुना मानला जातो. तो शिवकाळातील स्वराज्य विजयाचे प्रतिबिंब आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

अज्ञानदास यांची इतर रचना उपलब्ध नाही

अज्ञानदास यांच्या इतर कोणत्याही रचना उपलब्ध नाहीत, मात्र त्यांच्या या पोवाड्यामुळे ते अजरामर झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताय? मग या महत्त्वाच्या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal
येथे क्लिक करा