शिवाजी पार्कवर सभा, कार्यक्रमासाठी BMC किती भाडं घेते? आकडा वाचून तुम्हालाही धक्का बसेल

सूरज यादव

शिवाजी पार्क

दादरमधील शिवाजी पार्क मैदानात खेळपट्ट्या, व्यायामशाळा, गणेश मंदिर आणि नाना नानी पार्क आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे. पण हे मैदान राजकीय पक्षांच्या मेळाव्यासाठी ओळखलं जातं.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

मेळावे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ते शिवसेनेची स्थापना यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचे हे पार्क साक्षीदार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाढवा मेळावा याच मैदानात होतो.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

भाडं किती?

शिवाजी पार्कवर सभांसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असते. राजकीय सभांशिवाय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही हे पार्क भाड्यानं दिलं जातं.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

जीएसटीसह शुल्क

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी अगदी माफक शुल्क आकारण्यात येतं. एखाद्या कार्यक्रमासाठी फक्त २५० रुपये आणि जीएसटी इतकेच शुल्क आकारण्यात येते.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

डिपॉझिट

शुल्क २५० रुपये आणि जीएसटी याशिवाय डिपॉझिट म्हणून रक्कमही घेण्यात येते. सध्या ही डीपॉझिटची रक्कम २० हजार रुपये इतकी आहे.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

दुरुस्ती खर्च जास्त

सभा किंवा कार्यक्रमाच्या आयोजनानंतर मैदानाची दुरावस्था होते त्याचा खर्च डिपॉझिट रकमेतून करण्यात येतो. पण बऱ्याचदा देखभाल दुरुस्तीचा खर्च त्यापेक्षा जास्त असतो.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

परवानगी

शिवाजी पार्कवर सभा किंवा कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी बीएमसी किंवा पोलिसांकडे अर्ज करावा लागतो. यात कार्यक्रमाचा उद्देश, अपेक्षित गर्दी आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुविधा इत्यादींची माहिती द्यावी लागते.

Shivaji Park Sabha Fees

|

Esakal

एखादा देश दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतींना अटक करू शकतो का? आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो

nicolas maduro venezuela

|

Esakal

इथं क्लिक करा