Anuradha Vipat
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली शिवाली परब
‘महाराष्ट्राची क्रश’, ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून घराघरात शिवाली पोहोचली
सध्या शिवाली खूप चर्चेत आहे. नुकतीच शिवालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
अभिनेत्री शिवाली परब सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
याच संदर्भात शिवालीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शिवालीने ‘मंगला’ चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, आणि हे घडलं…प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, आपल्याला एक भूमिका अशी मिळावी ज्यात शीर्षक भूमिका आपण करावी आणि माझ्याबरोबर हे घडलं...
पुढे शिवालीने लिहिलं आहे की, इतके कमालीचे कलाकार आणि पहिलाच अनुभव शशांक शेंडे आणि अलका कुबल या दिग्गज कलाकारांबरोबर मिळाला...प्रेक्षकांना विनंती करते की मराठी चित्रपट आहे, सत्यघटनेवर आधारित आहे, नक्की सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा.