Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड संघात २८ जानेवारी २०२६ रोजी विशाखापट्टणमला टी२० सामना झाला.
India vs New Zealand
Sakal
या सामन्यात भारताला ५० धावांनी पराभवाचा सामना झाला, पण या सामन्यात शिवम दुबेच्या दमदार फलंदाजी केली.
Shivam Dube
Sakal
त्याने २३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १२ व्या षटकात इश सोधीविरुद्ध २८ धावा चोपल्या होत्या.
Shivam Dube
Sakal
त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माची बरोबरी केली.
Shivam Dube
Sakal
रोहितने २०२४ मध्ये ग्रोस आयलेट येथे ऑस्ट्रेलियालविरुद्धच्या टी२० सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका षटकात २८ धावा केल्या होत्या.
Rohit Sharma
Sakal
या यादीत अव्वल क्रमांकावर युवराज सिंग आहे, त्याने २००७ टी२० वर्ल्ड कपमध्ये डर्बनमध्ये इंग्लंडविरुद्ध स्टूअर्ट ब्रॉडच्या षटकात ३६ धावा काढल्या होत्या.
Yuvraj Singh
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे, त्याने २०२४ मध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रिषाद हुसैनच्या एका षटकात ३० धावा काढल्या होत्या.
Sanju Samson
Sakal
Jos Buttler
Sakal