Aarti Badade
पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याला तब्बल २ हजार वर्षांचा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे.
shivneri fort age history
Sakal
सातवाहन काळात शिवनेरीच्या परिसरात बौद्ध भिक्खूंसाठी अनेक लेणी कोरण्यात आली असून, त्यासाठी परदेशी व्यापाऱ्यांनीही दान दिल्याचे शिलालेखांतून समोर येते.
shivneri fort age history
Sakal
सातवाहन, अभिर, सिंद, शिलाहार, यादव, बहमनी, निजामशाही, मुघल, मराठे आणि इंग्रज अशा विविध राजवटींचा शिवनेरीशी संबंध राहिला आहे.
shivneri fort age history
Sakal
यादव काळात शिवनेरीचा किल्ला म्हणून वापर सुरू झाल्याचे सांगितले जाते आणि पुढे या गडाने अनेक सत्तांमधील बदल अनुभवले.
shivneri fort age history
Sakal
इ.स. १४४३ मध्ये बहमनी सरदार मलिक-उत-तुजारने शिवनेरी जिंकला, तर १४८६ मध्ये मलिक अहमदने निजामशाही स्थापन करून या गडाला पहिली राजधानी बनवली.
shivneri fort age history
Sakal
शहाजीराजांच्या काळात जिजाबाईंच्या सुरक्षिततेसाठी शिवनेरीची निवड करण्यात आली आणि याच ऐतिहासिक गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
shivneri fort age history
Sakal
प्राचीन लेणी, विविध राजवटींच्या स्थापत्यखुणा आणि शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या शिवनेरी किल्ल्याला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाच्या नामांकनामुळे जागतिक ओळख मिळाली आहे.
shivneri fort age history
Sakal
raiagd fort age
Sakal