Mayur Ratnaparkhe
शिवराज पाटील यांचा जन्म लातूरमधील चाकूर येथे १२ ऑगस्ट १९४५ रोजी झाला होता. आणि त्यांना कायद्याचे शिक्षण घेतले होते.
कॉंग्रेस पक्षासोबत राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात लोकप्रिय राजकीय नेता म्हणून उदय. लोकसभा तसेच राज्य पातळीवरील संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या.
केंद्रीय गृहमंत्री, विद्युतमंत्री, लोकसभा सभापती या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांसह त्यांना संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव होता.
अंतर्गत सुरक्षा, दहशतवादाविरुद्ध धोरण, सीमेवरील घडामोडींवर ठाम भूमिका. प्रशासकीय शिस्त, कायदा-सुव्यवस्था यावर विशेष भर.
शांत, संयमी आणि अभ्यासू नेता, कायद्यातील उत्तम व्यावहारिक ज्ञान, संसदेत उत्कृष्ट वक्तृत्व आणि सभागृह संचालन इत्यादी खास गुण त्यांच्याच होते.
ग्रामीण विकास, शिक्षण आणि युवकांना मार्गदर्शन, लातूर जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे जनसेवा याचबरोबर सामाजिक सौहार्द आणि शांतीचे समर्थक
गृहमंत्री असताना काही घटनांवर राजकीय विरोधकांनी टीका केली संयमी उत्तर आणि कायदेशीर आधाराने विवाद हाताळले.
संविधान, लोकशाही, राष्ट्रीय सुरक्षेबद्दल त्यांचे विचार प्रगल्भ होते. विविध भाषणे आणि लिखाणांमधून त्यांची तत्त्वनिष्ठ भूमिका दिसली.
शिवराज पाटील चाकुरकर हे अनुभवी आणि संयमी ज्येष्ठ राजकीय नेते होते. भारतीय राजकारणात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
Poster of Ranveer Singh’s film ‘Dhurandhar’, which has been denied release permission in Bahrain, Kuwait, Oman, Qatar, Saudi Arabia, and the UAE.
esakal