सकाळ डिजिटल टीम
शिवराज्याभिषेकाचं जे चित्र घराघरात दिसतं त्यात एक इंग्रज अधिकारी शिवरायांना मुजरा करताना दिसतो. त्या हेन्री ऑक्झेंडनने शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन त्याच्या डायरीत करून ठेवलंय.
हेन्री ओक्झेंडन हा इंग्लंडमधील सरदार घराण्यातला होता. त्याचे भाऊ व चुलते सगळेच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मोठ्या पदांवर होते.
हेन्रीचे बंधू जॉर्ज आणि क्रिस्टोफर ओक्झेंडन यांची समाधी आजही सुरत येथे पाहायला मिळते. जॉर्ज सुरतेचा अध्यक्ष होता.
भारताच्या राजकारणाची चांगली जाण असलेल्या हेन्रीने शिवाजी महाराजांशी तहाची बोलणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
हेन्रीने महाराजांना १ हिरेजडित शिरपेच, १ हिरेजडित सलकडी आणि २ मोती असा ₹१,६५० किमतीचा नजराणा दिला होता.
संभाजी महाराजांना हेन्रीने २ सलकडी आणि ८ हिऱ्यांची एक कंठी भेट दिली होती.
शिवाजी महाराजांनी हेन्रीला गडावर राहण्याची परवानगी दिली, मात्र तो राजपरिवारापासून एक मैल लांब राहत होता.
हेन्रीने गडावरील जेवणाचा अनुभव लिहिताना म्हटलं की, "डाळ आणि तांदळापासून बनवलेली लोण्याची खिचडी हे मुख्य अन्न आहे. यामुळे लोकांच्या अंगात चरबी वाढते!"
शिवराज्याभिषेकावेळी हेन्रीला खिचडी आवडली नाही हे शिवाजी महाराजांना समजलं. तेव्हा महाराजांनी दररोज अर्ध्या बकऱ्याचे मांस पाठवण्याची खास व्यवस्था केली होती.