Mayur Ratnaparkhe
FSSAI ने नॉन स्टँडर्ड फूड प्रॉडक्टच्या ब्रँड नावांमध्ये ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ORS) या शब्दाचा वापर पूर्णपणे बंदी घातली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेल्या फॉर्म्यूल्यासह असलेल्या उत्पादनांनाच "ORS" हा शब्द वापरला जाईल, असा आदेश आहे.
हा विजय हैदराबाद येथील बालरोगतज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांच्या आठ वर्षांच्या संघर्षाचे फलित आहे.
डॉ. शिवरंजनी संतोष यांनी सोशल मीडियावर जागरूकता मोहीम सुरू केली होती.
या निर्णयानंतर डॉ. शिवरंजनी भावूक झाल्याचे दिसून आले.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, त्यांनी या लढाईत सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
बाजारातील अनेक गोड पेये आणि एनर्जी ड्रिंक्सना "ओआरएस" लिहिले जात होते म्हणून हा लढा सुरू केला होता.
डॉ. शिवरंजनी संतोष यांचा हा विजय या दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानापासून मुलांना वाचवण्यास मदत करेल.
Sakal