हार्ट पेशंट्सनी कॉफी प्यावी की नाही?

Anushka Tapshalkar

कॉफी आणि हार्ट पेशंट

चहा आणि कॉफी ही दोन पेय प्रत्येक व्यक्तीला हवी असतताच. मात्र अनेक जणांना असं वाटतं की कॉफी हृदयरोगासाठी हानिकारक आहे. पण या बद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

हृदयासाठी कॉफी

नवीन संशोधनानुसार दररोज एक कप कॅफिनयुक्त कॉफी हृदयासाठी संरक्षणात्मक ठरते.

दशकांपासूनचा गैरसमज दूर!

कॅफिन हृदयाला हानिकारक मानलं जात होतं, पण वैज्ञानिकांनी हा समज चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

पहिल्यांदाच मोठं क्लिनिकल ट्रायल!

UC San Francisco आणि University of Adelaide यांच्या संशोधनात कॉफी पिणाऱ्यांचा A-Fib चा धोका 39% कमी आढळला.

A-Fib म्हणजे काय?

हृदयातील अत्रियामधील अनियमित विद्युतसंकेतांमुळे होणारी वेगवान धडधड—ज्यामुळे स्ट्रोक व हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

कॉफी कशी मदत करते?

कॅफिन मेटाबॉलिझम वाढवतं, हलकं डाययुरेटिक आहे, रक्तदाब कमी करण्यासही मदत करते. शिवाय कॉफीतील अँटी-इन्फ्लेमेटरी घटक हृदयासाठी चांगले.

How Coffee Helps

| Sakal

200 रुग्णांवर 6 महिन्यांचा अभ्यास

काहींना दररोज कॉफी देण्यात आली, तर काहींना पूर्णपणे टाळायला सांगितलं—कॉफी गटात A-Fib चे एपिसोड लक्षणीयरीत्या कमी आढळले.

तज्ञांचे स्पष्ट मत

कॉफी टाळण्याचा सल्ला आता अप्रासंगिक ठरणार आहे! संशोधकांच्या मते, कॉफी केवळ सुरक्षित नाही तर ए-फिबसाठी संरक्षण देणारी ठरू शकते.

Doctor's Advice | sakal

'या' 5 अँटी एजिंग टिप्स आहेत सर्वात इफेक्टिव्ह

आणखी वाचा