मासे खाल्ल्यानंतर दूध प्यावं की नाही? 99% लोकांना माहितच नाही उत्तर

Anushka Tapshalkar

मासे खाल्ल्यावर दूध

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की माशासोबत दूध पिऊ नये. पण यामागे खरंच किती तथ्य आहे आणि किती गैरसमज? जाणून घेऊया यामागचं सत्य.

पांढरे डाग

असा समज आहे की, माशासोबत दूध पिल्यानं पांढरे डाग येतात. हा समज अनेक वर्षांपासून लोकांमध्ये प्रचलित आहे, पण यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.

मासे आणि दूध दोन्ही पौष्टिक

दुधात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 असते, तर माशांमध्ये ओमेगा-3, प्रोटीन आणि व्हिटॅमिन D भरपूर प्रमाणात असते.

विज्ञान काय सांगतं?

वैज्ञानिकांच्या मते मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने विटिलिगो किंवा पांढरे डाग होत नाहीत. हा आजार इम्यून सिस्टीम आणि मेलानिनशी संबंधित असतो.

मग हा समज पसरला कसा?

लोकांमध्ये अशी धारणा आहे की मासे आणि दूध एकत्र आल्यावर शरीरात रासायनिक प्रतिक्रिया होते, पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

आयुर्वेदाचा वेगळा दृष्टिकोन

आयुर्वेदात मासे आणि दूध “विरुद्ध आहार” मानले जाते. हे संयोजन काही लोकांमध्ये पचनाशी संबंधित त्रास वाढवू शकते.

sakal

कोणाला होऊ शकतो त्रास?

ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे किंवा ज्यांना फूड अॅलर्जीची समस्या आहे, त्यांनी मासे आणि दूध एकत्र घेताना काळजी घ्यावी.

निष्कर्ष ?

माशासोबत दूध घेतल्याने गंभीर नुकसान होते, याचे ठोस पुरावे नाहीत. मात्र आपल्या शरीराची प्रतिक्रिया ओळखून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहार घ्यावा.

Doctor's Advice | sakal

भारतीय आंब्यांचा जगभर जलवा! 'या' देशात होते सर्वात जास्त मागणी

आणखी वाचा