डोकेदुखी झाली की चहा-कॉफी प्यावी का? जाणून घ्या!

Aarti Badade

डोकेदुखी आणि चहा-कॉफी

चहा-कॉफीमधील कॅफिन काही लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेनमध्ये तात्पुरता आराम देऊ शकते.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

कॅफिनचा फायदा होऊ शकतो

कॅफिनमुळे काही प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
म्हणूनच काही वेदनाशामक औषधांमध्येही कॅफिनचा वापर केला जातो.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

पण अति कॅफिन टाळा!

चहा किंवा कॉफीचे अतिसेवन उलट डोकेदुखीचे कारण ठरू शकते.
दररोज मोठ्या प्रमाणात कॅफिन घेण्याची सवय असल्यास डोकेदुखी होऊ शकते.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

अचानक चहा-कॉफी बंद करू नका

नियमित कॅफिन घेणाऱ्या व्यक्तीने ते अचानक बंद केल्यासही डोकेदुखी होऊ शकते.
त्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेऊन कॅफिनचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

डोकेदुखीवर आधी हे करून पाहा

सर्वप्रथम भरपूर पाणी प्या आणि शांत ठिकाणी थोडा वेळ आराम करा.
झोप पूर्ण झाली नसेल तर विश्रांती घ्या आणि काही काळ मोबाईल, लॅपटॉप व टीव्हीपासून दूर राहा.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

या गोष्टींकडेही लक्ष द्या

प्रखर प्रकाश आणि मोठा आवाज टाळा. वेळेवर जेवण करा आणि जास्त वेळ उपाशी राहू नका.
वारंवार डोकेदुखी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेण्याची सवय टाळा.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

ही लक्षणे दिसली तर सावध!

डोकेदुखी सतत वाढत असेल किंवा उपचार करूनही कमी होत नसेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Tea or Coffee for Headache

|

Sakal

पेरू की सफरचंद? आरोग्यासाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट?

Guava vs Apple

|

Sakal

येथे क्लिक करा