Anushka Tapshalkar
गरमागरम उन्हाळ्यात गोडसर आंबा खाण्याचा मोह कोण टाळेल? पण, रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणं योग्य आहे का?
झोपण्याच्या अगोदर आंबा खाल्ल्यास पचनाची समस्या होऊ शकते. त्यामुळे तो वेळ योग्य मानला जात नाही.
रात्री शरीराचा पचन क्रिया मंद होते. त्यावेळी गोड, उष्ण व पचायला जड पदार्थ टाळावेत.
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (fructose) मोठ्या प्रमाणात असते. ही साखर रात्री घेणे रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते.
रात्री उशिरा साखर घेणं शरीराला उर्जेचा सिग्नल देतं, त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
फळं खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळचा, विशेषतः पाण्याचा ग्लास घेतल्यावर. पचनशक्ती त्या वेळेस अधिक असते.
जेवण झाल्यानंतर लगेच आंबा किंवा इतर फळ खाल्ल्यास पचन नीट होत नाही, आणि अॅसिडिटीची तक्रार होऊ शकते.
फळं जेवणाच्या एक तास आधी किंवा दोन तासांनी खाल्ली तरी त्यातील पोषणद्रव्यं शरीराला योग्यरीत्या मिळतात.
जर रात्रीच आंबा खाणं आवश्यक वाटत असेल, तर प्रमाण कमी ठेवा आणि लवकर खा – म्हणजे झोपण्याच्या 2 तास आधी.
आंबा खा, पण वेळ आणि प्रमाण लक्षात ठेवा. आरोग्य टिकवायचं असेल तर सवयी सुधाराव्या लागतील!