Aarti Badade
प्रथिनं शरीरासाठी आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे.स्नायूंची वाढ व पुनर्बांधणी यासाठी प्रोटीन गरजेचे आहे.
बॉडीबिल्डिंग किंवा नियमित वर्कआउट करणाऱ्यांना जास्त प्रथिनांची गरज असते.त्यासाठी काही प्रमाणात प्रोटीन शेक पूरक ठरतो.
तज्ज्ञांच्या मते, प्रोटीन शेक व्यायामापूर्वी किंवा नंतर कधीही घेतला तरी चालतो.महत्त्वाचे म्हणजे एकूण दिवसातील प्रथिनांची गरज पूर्ण होणे.
70-80% प्रथिनांची गरज नैसर्गिक आहारातूनच पूर्ण करावी.उर्वरित गरजा शेक किंवा पूरक आहारातून पूर्ण केल्या जाऊ शकतात.
डॉक्टर शरीराची गरज समजून चाचण्यांच्या आधारे प्रोटीन पूरक सुचवतात. केवळ जिम ट्रेनरच्या सांगण्यावरून पावडर घेणे धोकादायक ठरू शकते.
अंडी, दूध, डाळी, कडधान्ये, मांसाहार हे उत्तम प्रथिनांचे नैसर्गिक स्रोत आहेत.प्रोटीन पावडरवर अवलंबून न राहता नैसर्गिक पर्याय निवडा.
प्रोटीन शेक कधी प्यावा हे कमी महत्त्वाचे, पण एकूण प्रथिनांची गरज पूर्ण करणे अत्यावश्यक. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि नैसर्गिक आहारावर भर देणे अधिक सुरक्षित.