Pranali Kodre
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे अखेर दिल्लीकडून १३ वर्षांनंतर रणजी पुनरागमन झाले.
विराट गुरुवारी (३० जानेवारी) दिल्लीकडून रेल्वेविरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला.
हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
दरम्यान, विराट हा खवय्या असला, तरी तो त्याच्या फिटनेसच्या दृष्टीने त्याचं जेवण आणि नाश्ता करतो.
त्याला पूर्वी चिली चिकन खायला आवडायचे, पण त्याने काही वर्षांपूर्वी त्याच्या फिटनेससाठी मांसाहारी आहार बंद केला.
त्याने रणजी ट्रॉफीत पुनरागमन करण्यापूर्वी दिल्ली संघासोबत सराव करतानाही छोले-पुरी खाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्याने संघसहकाऱ्यांसोबत कढी-भात खाल्ला होता.
आता त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी जेवणासाठी चिली पनीर मागवण्याची विनंती केली असल्याचे समजत आहे.
त्यामुळे दिल्लीत असताना सामन्याच्या पहिल्या दिवशी तरी तो चिली पनीर खाणार असल्याचे समजत आहे.