सकाळ डिजिटल टीम
महिला प्रिमिअर लिगच्या पहिला सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाला मोठा धक्का बसला.
आरसीबीची फिरकीपटू श्रेयंका पाटीलला WPL पहिल्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.
श्रेयंकाने मागच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या व पर्पल कॅप जिंकली होती.
पण दुखापतीमुळे तिला पहिला सामना खेळता आलेला नाही.
२२ वर्षीय श्रेयंका पाटील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपासून मैदानाबाहेर आहे.
शेवटच्या क्षणी पदरी निराशा पडल्यामुळे श्रेयंकाने 'हार्डब्रोकन' म्हणत ट्वीट केले आहे.
ज्यामध्ये तिने लवकरच पुनरागमन करणार असल्याचाही संदेश दिला.
त्याचबरोबर आरसीबीची दुसरी अष्टपैलू एलिस पेरी खेळाडू दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात गोलंदाजी करणार नाही.