सकाळ डिजिटल टीम
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
भारताने व ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत प्रत्येकी दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
यंदा रोहितच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या संघाची यादी जाणून घेऊयात.
१९९८ साली पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकावले.
२००० साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा न्यूझीलंडने जिंकली.
भारत व श्रीलंकेने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत २००२ साली संयुक्त विजेतेपद पटकावले.
वेस्ट इंडिजने २००४ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
२००६ साली भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
त्यानंतर २००९ साली देखील ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
इंग्लंडमध्ये २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विजेतेपद पटकावले.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेत पाकिस्तानने जेतेपद जिंकले.