Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असून प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे तीन संघ निश्चितही झाले आहेत.
या तीन संघांमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्सचाही समावेश आहे.
पंजाबने १२ सामन्यांनंतरच प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. अजूनही त्यांचे साखळी फेरीतील २ सामने बाकी आहेत.
दरम्यान, पंजाबने आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले असल्याने श्रेयस अय्यरच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.
श्रेयस अय्यर असा एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात तीन संघ आयपीएल प्लेऑफमध्ये पोहचले आहेत.
श्रेयस अय्यरने २०१९ आणि २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना प्लेऑफ गाठली होती.
श्रेयसच्या नेतृत्वात २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने फक्त प्लेऑफच गाठली नाही, तर आयपीएल विजेतेपदही पटकावले होते.
त्यानंतर आता त्याच्या नेतृत्वात पंजाब संघही प्लेऑफ खेळणार आहे. आता त्याला सलग दुसऱ्यांदा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे