Payal Naik
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.
त्याने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली.
आज २७ जानेवारी रोजी श्रेयसचा वाढदिवस आहे.
मुंबईत जन्मलेल्या श्रेयसचं कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय होतं.
मात्र, मनोरंजन विश्वात स्थिरावण्यासाठी श्रेयसने कधीही कुणाची मदत घेतली नाही.
श्रेयसच्या आयुष्यात एक अशीही वेळ आली होती, जेव्हा त्याच्याकडे खाण्यासाठी देखील पैसे नव्हते.
त्याच्याकडे घरभाड्यासाठी द्यायलाही पैसे नसायचे. आता तो एका चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये घेतो.
त्याने 'पुष्पा' चित्रपटात अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज दिलेला. तेव्हापासून त्याच्या लोकप्रियतेत जास्त वाढ झाली.
२० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत श्रेयस तळपदे याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.