शुभांशु शुक्लांना अंतराळात किती पगार मिळणार?

सकाळ वृत्तसेवा

Axiom-4 मिशन: भारताचा ऐतिहासिक क्षण!

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज ISS (International Space Station) मोहिमेसाठी अंतराळात जात आहेत. हा भारतासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे!

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

भारताचा पहिला प्रतिनिधी ISS वर!

शुभांशु शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय वैज्ञानिक ठरतील.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

शुभांशु शुक्लांना किती मानधन? 

या मिशनसाठी त्यांना वेगळा पगार किंवा मानधन मिळणार नाही.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

मिशनचा खर्च भारत सरकारकडून 

भारत सरकारने Axiom Space या अमेरिकन कंपनीला सुमारे ₹५४८ कोटी दिले आहेत.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

या खर्चात काय समाविष्ट आहे? 

या खर्चात प्रशिक्षण, अंतराळ सूट, स्पेस रिसर्च किट, प्रवास आणि इतर गरजेच्या गोष्टी समाविष्ट आहेत.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

किती दिवसांचा आहे हा अंतराळ प्रवास? 

ही मोहीम १४ दिवसांची आहे. यात सुमारे ६० वैज्ञानिक प्रयोग केले जातील.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

कसे प्रयोग करतील शुभांशु? 

शुभांशु माइक्रोग्रॅविटीमध्ये मानवी शरीराचा अभ्यास करतील. ते स्पेस फूड तपासतील, जैविक संशोधन करतील.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

शुभांशु शुक्ला यांचा प्रवास 

ते मूळचे लखनौचे आहेत. त्यांनी NDA आणि IISc बेंगळुरु येथून शिक्षण घेतले. २००६ पासून ते वायुसेनेत फायटर पायलट आहेत. त्यांना २००० पेक्षा जास्त तासांचा उड्डाण अनुभव आहे.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

गगनयानच्या प्रशिक्षणातून अंतराळाकडे

२०१९ मध्ये त्यांची गगनयान मिशनसाठी निवड झाली होती. त्यांनी रशिया आणि भारतात खूप कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

Indian astronaut Shubhanshu Shukla salary | Sakal

स्लिप डिस्कची सुरुवातीची लक्षणे कोणती?

slipped disc | Sakal
येथे क्लिक करा