IND vs NZ वनडे मालिकेनंतर शुभमन गिल विरुद्ध रवींद्र जडेजा एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार?

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका नुकतीच रविवारी (१८ जानेवारी) संपली आहे. यानंतर आता २१ जानेवारीपासून टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे.

India vs New Zealand

|

Sakal

वनडे संघातील खेळाडूंचा टी२० मध्ये समावेश नाही

पण वनडे मालिकेत खेळलेले अनेक खेळाडू टी२० मालिकेचा भाग नाहीत. यात रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल यांचाही समावेश आहे.

India vs New Zealand

|

Sakal

रवींद्र जडेजा विरुद्ध शुभमन गिल

त्यामुळे आता जरी ते पुढचे काही महिने भारतीय संघाच्या जर्सीत दिसणार नसले तरी काहीच दिवसात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसू शकतात.

Shubman Gill

|

Sakal

रणजी ट्रॉफी

कारण अद्याप रणजी ट्ऱॉफी २०२५-२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील दोन सामने आणि बाद फेरीही बाकी असल्याने ते आपापल्या राज्य संघांकडून खेळताना दिसू शकतात.

Ranji Trophy

|

Sakal

सौराष्ट्र विरुद्ध पंजाब

जडेजा हा सौराष्ट्रकडून, तर गिल पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात सौराष्ट्र आणि पंजाब संघ आमने-सामने येणार आहेत.

Ravindra Jadeja

|

Sakal

रणजी खेळण्याचा पर्याय

आता आयपीएल २०२६ पूर्वी हे दोघेही भारतासाठी खेळणार नसल्याने त्यांच्याकडे रणजी खेळण्याचा पर्याय आहे.

Shubman Gill

|

Sakal

अंतिम निर्णय

तथापि, क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सौराष्ट्र आणि पंजाब यांच्यात २२ जानेवारीपासून राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या रणजी सामन्यात रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार आहेत.

Ravindra Jadeja

|

Sakal

गिल पहिल्यांदाच खेळणार

दरम्यान, गिल जर सौराष्ट्रविरुद्ध खेळला, तर हा त्याचा यंदाच्या रणजी ट्रॉफीतील पहिला सामना असेल. जडेजा यापूर्वी चालू रणजी ट्रॉफी हंगामात एक सामना खेळला होता. तो सौराष्ट्रकडून मध्यप्रदेशविरुद्ध खेळला होता.

Shubman Gill

|

Sakal

पुढील वाटा कठीण

तथापि, सौराष्ट्र आणि पंजाब यांच्यासमोरील पुढील वाटा कठीण आहेत. त्यांना बाद फेरीत प्रवेशासाठी त्यांच्या दोन्ही साखळी सामन्यांतील विजयासोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

Ravindra Jadeja

|

Sakal

पंजाब आणि सौराष्ट्रचे स्थान

सौराष्ट्र आणि पंजाब साखळी फेरीसाठी एलिट बी गटात सामील आहेत. चौथ्या क्रमांकावर सौराष्ट्र आहे. पंजाब ६ व्या क्रमांकावर आहे.

Shubman Gill

|

Sakal

भारतात सर्वाधिक ODI सामने खेळणारे खेळाडू

Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा