Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत २९ मे रोजी क्वालिफायर २ सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
Shubman Gill IPL Records
Sakal
गुजरातच्या या विजयात कर्णधार शुभमन गिलचा वाटा मोठा होता. त्याने ५३ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १०४ धावांची शतकी खेळी केली.
Shubman Gill IPL Records
Sakal
या शतकी खेळीदरम्यान गिलने ४ मोठे विक्रम केले.
Shubman Gill IPL Records
Sakal
शुभमन गिलने ४७ चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा खेळाडू ठरला.
Shubman Gill IPL Records
Sakal
याशिवाय हे गुजरात टायटन्ससाठी सर्वात कमी चेंडूतील शतकही ठरले. त्याने त्याचाच २०२३ आयपीएलमधील क्वालिफायर २ सामन्यातील विक्रम मोडला. त्यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध ४९ चेंडूत शतक केले होते.
Shubman Gill IPL Records
Sakal
आयपीएल प्लेऑफमध्ये २ शतके करणारा शुभमन गिल पहिलाच खेळाडूही ठरला आहे. त्याने IPL 2023 च्या क्वालिफायर २ सामन्यात गुजरातसाठीच खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक केले होते.
Shubman Gill IPL Records
Sakal
याशिवाय शुभमन गिल आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात शतक करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
Shubman Gill IPL Records
Sakal
Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027
Sakal