Swadesh Ghanekar
आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सा संघ गुणतालिकेत अव्वल आहे
आयपीएलमध्ये शुभमन गिलने ८ सामन्यांत ४३.५७च्या सरासरीने ३०५ धावा केल्या आहेत.
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या अफवा गेल्या काही वर्षांपासून जोरात आहेत.
काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर व शुभमन गिल यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचे वृत्त समोर आले होते.
शुभमन गिलने नुकतीच एका पोर्टलला मुलाखत दिली आणि त्यात त्याने त्याच्या डेटिंगच्या चर्चांबाबतचे सत्य उलगडले.
"मी गेली तीन वर्षे सिंगल आहे. अनेक वेळा माझं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडण्यात आलं, काही वेळा तर असे लोक होते, जे मला कधी भेटलेही नाहीत," असं गिलने स्पष्ट सांगितलं.
त्याने असंही नमूद केलं की, सध्या तो फक्त आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.
शुभमन गिलने आपलं प्रेमजीवन बाजूला ठेवून मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.