Shubham Banubakode
शुभमन गिलची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्याच्यातील नेतृत्वगुणांमुळे बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
फाजिल्का येथे जन्मलेल्या गिलच्या क्रिकेट कारकिर्दीला त्याच्या वडिलांनी आकार दिला. क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्यांनी फाजिल्का सोडून मोहाली येथे स्थलांतर केले.
यंदाच्या लोहडीच्या सणात शुभमन गिलने आपल्या कुटुंबाला एक आलिशान घर भेट दिले. हे घर पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात आहे.
शुभमन गिलच्या घराचे बाह्य डिझाइन एखाद्या महालापेक्षा कमी नाही. गोलाकार पॅटर्नमधील भव्य खांब आणि ग्रँड प्रवेशद्वार यामुळे घराला रॉयल लूक मिळतो.
घरातील लिव्हिंग एरिया हा शुभमनच्या घराचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. अॅक्सेंट फर्निचर आणि लाकडी सोफ्यांचे सुंदर डिझाइन यामुळे हा भाग शाही वाटतो.
शुभमनच्या घरातील जिम एरिया अत्याधुनिक आहे, जिथे मोठ्या काचेच्या खिडक्या आणि लाकडी फ्लोअरिंग आहे. या जिममध्ये अनेक उपकरणे आहेत.
शुभमनच्या घराचे गार्डन त्याच्या सौंदर्यात भर घालते. छोट्या रोपट्यांच्या कुंपणासह, मोठी झाडे आणि नीट राखलेल्या गवताने सजलेले हे गार्डन घराला निसर्गाचा स्पर्श देते.