Mayur Ratnaparkhe
शुभमन गिलचा बीसीसीआयच्या २०२४-२०२५ च्या वार्षिक कराराच्या यादीत ग्रेड ‘ए’ मध्ये समावेश आहे.
शुभमन गिलला बीसीसीआयकडून दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात. त्याचवेळी, प्रत्येक सामन्याचे मानधन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळे असते.
शुभमन गिलला एका कसोटीसाठी १५ लाख रुपये मिळतात.
शुभमन गिलला एका एकदिवसीयसाठी सामन्यासाठी सहा लाख रुपये मिळतात
तर एका T20 सामन्यासाठी शुभमन गिलला तीन लाख रुपये मिळतात.
शुभमन गिल सध्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे, त्याला आयपीएल २०२५ मध्ये १६.५ कोटी रुपये मिळालेत.
२०२५ पर्यंत शुभमन गिलची एकूण संपत्ती सुमारे ३२ ते ३४ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या अलीशान कार आहेत? -
शुभमन गिलकडे रेंज रोव्हर एसयूव्ही, मर्सिडीज बेंझ E350 आणि महिंद्रा थार देखील आहे, जी त्याला आनंद महिंद्रा यांनी भेट दिली होती.