Mayur Ratnaparkhe
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण ढगफुटी झाली.
या ढगफुटीचा सर्वाधिक फटका धराली गावाला बसला आहे.
महापुराने वाहून आणलेल्या गाळात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याठी लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे,
यावेळी आलेल्या मुसळधार पावसामुळे या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे
५० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत, याशिवाय लष्कराचे १० जवानही बेपत्ता असल्याची माहिती आहे