वनडे, कसोटी आणि टी२० मधील कर्णधार म्हणून पहिला सामना हरणारे दोन भारतीय क्रिकेटर

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

पर्थला १९ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभूत केले.

India vs Australia

|

Sakal

गिलचा कर्णधार म्हणून पहिला वनडे

हा शुभमन गिलचा वनडे कर्णधार म्हणून पहिला सामना होता.

Shubman Gill

|

Sakal

तिन्ही प्रकारात नेतृत्व

दरम्यान, गिल भारताच्या कसोटी संघाचाही कर्णधार आहे, तर त्याने २०२४ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात भारताच्या टी२० संघाचेही नेतृत्व केले होते.

Shubman Gill

|

Sakal

पहिल्या कसोटीत पराभूत

गिलने २० ते २४ जून २०२५ दरम्यान लीड्समध्ये भारताचे पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध कसोटीत नेतृत्व केले, ज्यात भारताला ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

Shubman Gill

|

Sakal

पहिल्या टी२० सामन्यात पराभूत

त्याधी गिलने झिम्बाब्वेमध्ये २०२४ साली खेळलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही कर्णधार म्हणून पराभव स्वीकारला होता.

Shubman Gill

|

Sakal

दुसराच भारतीय कर्णधार

त्यामुळे गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून पहिला सामना पराभूत होणारा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.

Shubman Gill

|

Sakal

विराटचा पहिला कसोटी पराभव

विराटने डिसेंबर २०१४ मध्ये ऍडलेडला भारताच्या कसोटी संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले होते, ज्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

Virat Kohli

|

Sakal

विराटचा पहिला वनडे पराभव

विराट २ जुलै २०१३ रोजी वनडेत कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध किंग्स्टनला पहिला सामना खेळला, ज्यात भारताला १६१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Virat Kohli

|

Sakal

विराटचा पहिला टी२० पराभव

२६ जानेवारी २०१७ रोजी विराटने इंग्लंडविरुद्ध कानपूरमध्ये कर्णधार म्हणून पहिला टी२० सामना खेळला, ज्यात भारतीय संघ ७ विकेट्सने पराभूत झाला होता.

Virat Kohli

|

Sakal

स्मृती मानधना लवकरच अडकणार लग्नबंधनात? होणाऱ्या नवऱ्यानेच केला खुलासा

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

येथे क्लिक करा